भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल

भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल

अमरावती | Amravati

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अमरावतीमध्ये बोलताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, या भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, पण त्यांना आत्मविश्वास नाही. आपण मोठे झालो, सत्ताधीश झालो तरीही आपण निवडून येऊ की नाही, याची धाकधूक त्यांना आहे. त्यामुळे समोर कुणाला ठेवायचंच नाही. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर करायचा. पोलिसांमार्फत नोटीसा पाठवायच्या. अरे मर्दाची अवलाद असाल तर या यंत्रणा जरा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.

मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्यावरुन भाजपने रान उठवलं आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. जर कोविड काळातला मुंबई महापालिकेचा घोटाळा काढायचं असेल तर राज्यातील प्रत्येक महापालिकेचा कोविड काळातील घोटाळा काढायचा असेल तर राज्यातला आणि प्रत्येक महापालिकेतील घोटाळा शोधा. यासोबतच पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा, असं खुलं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. म्हणजे स्वत:च ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायंच वाकून हे तुमचं हिंदूत्व. महाराणा प्रताप यांच्यासारखा वीर खुलेआम लढला. जो वीर असेल त्याने बोलायचं, पण पण चोर, लुटेरु आणि नामर्दांची लायकी नाही गर्व से कहो हम हिंदू हे असं म्हणायची. मुंह मे राम और बगल मे छुरी हे आमचं हिंदुत्व नाही. मुंह मे राम और हाताला ताण हे आमचं हिंदुत्त्व आहे. आम्ही भाजजपकडून हिंदुत्त्व शिकलो नाही, अशी सणसणीत टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल
Shivsena Crisis : उद्धव ठाकरेंना 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' परत मिळणार?

पुढे बोलताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, मला एक गोष्ट कळत नाही. जे तुमच्या बरोबर राहिले, आम्ही २५ वर्ष तुमच्याबरोबर राहिलो, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. तुम्ही अगदी शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी (शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे) तुम्हाला वाचवलं. नाहीतर अटल बिहारी वाजपेयी यांनी (भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचं वरिष्ठ नेतृत्त्व) तुम्हाला तेव्हाच कचऱ्यात टाकलं होतं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एकमेव व्यक्ती होती, जी तुमच्या पाठिशी उभी होती. आत्ताच्या या पंतप्रधानांच्या पाठिशी हा एकमेव माणूस उभा राहिला. तेव्हा बाळासाहेब यांच्या पाठिशी नसते तर आज हे (नरेंद्र मोदी) जगातल्या सर्वोत्तम पंतप्रधानांच्या यादीत असते का? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली तिथे मोठ्या दंगली पेटल्या होत्या. जगभरातील लोकांनी, वृत्तपत्रांनी थेट नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं होतं. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीदेखील मोदींच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी आज त्याच गोष्टीची आठवण करून दिली.

भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल
Ncp Crisis : आम्ही भांडत बसलो अन् भाजपा मजा बघतंय; रोहित पवारांचा घणाघात

तसेच, पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्षच चोरला जात आहे. हे एक नवे राजकारण भाजपने सुरू केले आहे. त्यासाठी अगदी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे आणि ते नाव मी कुठेही जाऊ देणार नाही. कारण माझ्या वडिलांनी, आजोबांनीच हे नाव पक्षाला दिले आहे. माझ्या पक्षाचे नाव इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाही नाही. जे काही राजकीय पक्ष आहेत त्या निवडणुकीत काही गैरव्यवहार तर करत नाही ना? इतपत निवडणूक आयोगाचा अधिकार आम्ही समजू शकतो. पण, आमच्या पक्षाचे नाव इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. अन्यथा, आम्ही निवडणूक आयोगाचे नाव बदलू, ते आयोगाला मान्य असेल का?, असा सवाल देखील त्यांनी केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com