अटकेच्या भितीपोटी देशमुख ईडीसमोर हजर होत नसावेत

अटकेच्या भितीपोटी देशमुख ईडीसमोर हजर होत नसावेत

राम शिंदे यांचा टोला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

परळीत (Parali) आलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याबाबतीत जे काही घडले, त्यावरून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान रचल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे जर राज्यातील (State) एखाद्या मंत्र्याकडूनच कोणावर अन्याय (Injustice) करण्याची भूमिका दिसून येत असेल तर त्याची सखोल चौकशी (Investigation) झाली पाहिजे. प्रसारमाध्यमांतून घटनेच्यावेळचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून हे मोठे कारस्थान असल्याचे दिसते, असा आरोप भाजपचे माजी मंत्री शिंदे (Former BJP minister Ram Shinde) यांनी केला.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था (State Law and order) ढासळलेली आहे. केंद्रीय मंत्र्याला तात्काळ अटक (Central Minister Arrested) केली जाते. गुन्हा घडला महाडमध्ये (Mahad), दाखल केला नाशिकमध्ये (Nashik) आणि स्थानबद्ध केले रत्नागिरीत (Ratnagiri). केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीने अटक केली जाते आणि आता माजी गृहमंत्र्याविरुद्ध लूक आऊटची नोटीस जारी होऊनही माजी गृहमंत्री (Former Home Minister) सापडत नाही, हे पटत नाही. खरे तर त्यांनी स्वत: होऊन तपास यंत्रणेसमोर यायला हवे. पाच नोटीसा जाऊनही ते हजर होत नाहीत. भीती वाटत असल्याने ते अटक टाळत असावेत, असा टोला भाजपचे माजी मंत्री राम शिंदे (Former BJP minister Ram Shinde) यांनी लगावला आहे.

राम शिंदे (Former BJP minister Ram Shinde) यांनी सोमवारी नगरमध्ये प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर परखड मत मांडले. करोनाच्या काळात सामान्य लोकांची गर्दी पांगविण्यासाठी याच गृहमंत्र्यांनी पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवण्यास सांगितले होते. कदाचित आता त्यांना याच लाठ्यांची भीती वाटत असावी. केंद्रीय मंत्र्याला अटक होते आणि माजी गृहमंत्री सापडत नाही, असा या राज्याचा कारभार आहे. त्यामुळे जनतेचा यांच्यावर विश्वास राहिला नाही, अशी टीकाही (criticism) शिंदे (Ram Shinde) यांनी केली.

यावेळी त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) जिल्ह्यासाठी कमी वेळ देत असल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री कधीही जिल्ह्यातील नागरिकांचा विचार करीत नाहीत. त्यांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत. त्यांच्या दु:खात सहभागी होत नाहीत. नुकसान झाल्यावर दिलासा देत नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही अनेकदा सांगतो आहोत, पण ऐकून घेत नाहीत. आपल्या जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. जर मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांना नेहमी येथे यायला जमत नसले तर येथील एखाद्या मंत्र्यांकडे हे अधिकार सोपवावेत. इतर मंत्र्यांनी तरी पालकमंत्र्यांची कमी भरून काढावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही शिंदे (Ram Shinde) यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com