गुप्तेश्वर पांडे यांचा जदयूमध्ये प्रवेश

विधानसभा निवडणूक लढवणार
गुप्तेश्वर पांडे यांचा जदयूमध्ये प्रवेश

नवी दिल्ली -

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी

रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जदयूमध्ये प्रवेश केला. सुशांत प्रकरणात मुंबई व महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यापासून पांडे चर्चेत आले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवेशाविषयी बोललं जात होतं.

आयपीएस अधिकारी असलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी सोमवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केली. त्यानंतर 24 तासांत त्यांचा राजीनामाही मंजुर करण्यात आला. कार्यकाळ संपण्यासासाठी अवघे पाच महिने शिल्लक असतानाच त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. त्यांच्या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली होती. पांडे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com