पुणे लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असणाऱ्यांची जोरदार चर्चा

पुणे लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असणाऱ्यांची जोरदार चर्चा

पुणे | Pune

पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी येत्या सहा महिन्यात पोटनिवडणूक (By-elections) होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे.

काही इच्छुकांचे तर भावी खासदार (MP) म्हणून बॅनरही लावण्यात आले. अशा परिस्थितीत भाजप कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून (Congress) कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची तयारी आहे; तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी चालवली आहे.

भाजपमध्ये गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय काकडे या नावांवर सध्या चर्चा सुरू आहे.

पुणे लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असणाऱ्यांची जोरदार चर्चा
सरकारचं 'डेथ वॉरंट' निघालं, १५ दिवसात...; संजय राऊतांचे मोठे विधान

संजय काकडे, मेधा कुळकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांना राजकीय अनुभव मोठा आहे. तर स्वरदा बापट या नवख्या आहेत. जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुकांचे तर शहरात भावी खासदार म्हणून बॅनर झळकायला सुरुवात झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या जागेसाठी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) वतीने तिकीटासंदर्भात अद्याप कोणतीही स्पष्टता नसूनही अशा पद्धतीने गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या असणाऱ्या इच्छुक उमेदवारांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com