Saturday, April 27, 2024
Homeराजकीयममतांच्या तृणमूलमध्ये गळती सुरुच; 'या' पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

ममतांच्या तृणमूलमध्ये गळती सुरुच; ‘या’ पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

दिल्ली l Delhi

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका यंदा बहुरंगी होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षानं (BJP) बंगालची सत्ता ताब्यात घेण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान,

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीनंतर पश्चिम बंगालचे माजी मंत्री राजीव बॅनर्जी यांनी तृणमूलला रामराम ठोकत भाजपात पक्षप्रवेश केला आहे. बॅनर्जी यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली असून, त्यांच्यासोबत आमदार प्रबीर घोषाल, वैशाली डालमिया तसेच हावडाचे माजी महापौर रतिन चक्रवर्ती यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत जाऊन भाजपात पक्षप्रवेश केला आहे. यादरम्यान नदिया जिल्ह्यातील राणाघाट मतदार संघातील तृणमूलचे माजी आमदार पार्थसारथी चट्टोपाध्याय आणि अभिनेता रुद्रनील घोष हे सुद्धा पक्षप्रवेश करतांना सोबत होते.

शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘तृणमूलचे माजी नेते राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला विश्वास आहे की, सोनार बांग्लासाठी भाजपाच्या लढाईला हे सर्वजण आणखी मजबूत करतील,’

दरम्यान, यावर्षी पश्चिम बंगाल विधानसभेचे निवडणुक यावर्षी होणार असून, त्यापार्श्वभुमीवर भाजपने आपली कंबर कसली असली, ममता दिदी यांच्या समोर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे. कारण तृणमूलचे बहुतांश नेते मंडळींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या