राहुल गांधींच्या 'हम दो हमारे दो'ला अर्थमंत्र्यांचे जोरदार प्रतिउत्तर

हम दो हमारे दो म्हणत उद्योगपतींचे सरकार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता
राहुल गांधींच्या 'हम दो हमारे दो'ला अर्थमंत्र्यांचे जोरदार प्रतिउत्तर

दिल्ली l Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला लोकसभेत उत्तर दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बोलताना अर्थमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला.

या वेळी त्या बोलतांना म्हणाल्या की, हम दो, हमारे दो याचा अर्थ असा आहे, दोन व्यक्ती पक्षाची चिंता करत आहेत आणि आणखी दोन व्यक्ती आहेत, मुलगी आणि जावई. ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे. पण, आम्ही असं करत नाही. सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेतंर्गत ५० लाख स्ट्रीट वेंडर्संना एका वर्षांसाठी १० हजार कोटी रूपये देण्यात आले. ते लोक क्रोनी भांडवलदार नाहीत, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लगावला.

तसेच, सर्वसाधारण अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्री असल्याचा आरोपही केला होता. या आरोपाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाचार घेतला. दोन लोक पार्टीची काळजी घेतायेत आणि आणखी दोन लोक आहेत ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, यावेळी बोलताना सीतारमण यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढला. सीतारामन यांनी आकडेवारी वाचून दाखवत विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा केला. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या,अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्रीय असल्याचा हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून, गरीबांना मदत करणारा आहे. अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळणार आहे, असा डावाची सिर्माला सीतारमन यांनी यावेळी होता. असल्याचा दावा सीतारामन यांनी केला.

तसेच,आम्हाला क्रोनी कॅपिटालिस्ट म्हणतात? शशी थरूर इथे उपस्थित आहेत. जेव्हा केरळमध्ये यांचं सरकार होतं, तेव्हा यांनी एका भांडवलदाराला बोलवलं होतं. कोणतीही निविदा नाही. आमचा क्रोनी सर्वसामान्य माणूस आहे. ज्यांना घर मिळतं. स्वनिधी योजनेचा फायदा मिळतो, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. तसेच, पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे गरिबांना फायदा झाला आहे. मागास आणि मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समूहांना फायदा झाला आहे. आम्ही यांच्यासाठी काम करतो, जावयासाठी नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शेतकरी मुद्याद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेसनं निवडणूक जिंकण्यासाठी शेतकरी मुद्यावर यू-टर्न घेतलाय. मध्यप्रदेश आणि राजस्थानात त्यांच्या निवडणुकीतील घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही. आम्हाला अपेक्षा होती की पंजाब सरकार शेतकऱ्यांना दिलासा देईल. तीन कायद्यांतील काही त्रुटी निदर्शनास आणून देतील. दाखवून देतील की हे कायदे नेमके कसे शेतकरीविरोधी आहेत, परंतु, असं काहीही घडलं नाही, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना मुद्दा बनवणाऱ्या काँग्रेसनं अनेक राज्यांत शेतकऱ्यांची फसवणूक केलीय, असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय.

केंद्रीय कृषी कायद्यांवरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच हम दो हमारे दो म्हणत उद्योगपतींचे सरकार असल्याचा आरोप केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com