अखेर संभाजीराजेंकडून 'त्या' विधानाबद्दल खेद व्यक्त, म्हणाले...

सध्या राज्यातील राजकारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापले आहे.
अखेर संभाजीराजेंकडून 'त्या' विधानाबद्दल खेद व्यक्त, म्हणाले...

मुंबई | Mumbai

सध्या राज्यातील राजकारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापले आहे. राज्य घटना बदलून टाकण्याच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले होते. यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर राज्यघटनेत बदल करण्याच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर करत आपल्या विधानाबद्दल अखेर खुलासा केला आहे. 'आताच मी पुरग्रस्त भागाची पाहणी करून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. आणि मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेल्या बातम्या दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे. मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना 'दुरुस्ती' ऐवजी 'बदल' हा शब्द निघाला असावा' तसेच 'पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मराठा आरक्षणा बाबत संसदेत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो असे विद्वान सांगत आहेत, आणि मी त्याचा अभ्यास करून पावले उचलणार आहे' असं म्हणत संभाजीराजेंनी खेद व्यक्त केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com