कोरोनाविरोधातील लढाई : पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचे कौतूक

कोरोनाविरोधातील लढाई : पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचे कौतूक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई / प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांवर विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल महाराष्ट्राला शाबासकी दिली.

नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. त्यावेळी मोदी यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, अशा शब्दात महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले.

यावेळी ठाकरे यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती करताना विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र कसे नियोजन करीत आहे, त्याविषयी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com