शेतकर्‍याला दुधाला भाव मिळवून देण्यासाठी भाजपाचे पोस्टल आंदोलन
राजकीय

शेतकर्‍याला दुधाला भाव मिळवून देण्यासाठी भाजपाचे पोस्टल आंदोलन

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्यावतीने उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला प्रतिलिटर 30 रुपये भाव मिळाला पाहिजे. दुधाकरीता 10 रुपये अनुदान दिले पाहिजे तसेच दूध पावडरिस 50 रुपये प्रतिकिलो अनुदान दिले पाहिजे म्हणून वेळोवेळी आंदोलन करण्यात आले.

परंतु या निष्क्रिय तीन पायाच्या आघाडी सरकारने मात्र यांची अजूनही दखल घेतलेली नाही. मात्र सुस्त बसलेले मुख्यमंत्र्यांना व मंत्रिमंडळाला जाग येण्यासाठी सर्व राज्यभरात भाजपाच्यावतीने महादुध एल्गार आंदोलन पुकारण्यात आला.

त्या अनुषंगाने भाजपाच्यावतीने राज्यभरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पत्र पाठवण्यात येत आहे हे पत्र वाचून तरी या सुस्त झालेल्या निष्क्रिय सरकारला आतातरी जाग येईल. यासाठी भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी सर्व बुथ स्तरावरून मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून अनोखे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील वाणी, अशोक कारखान्याचे संचालक बबन मुठे, अनिल भनगडे, गणेश राठी, मारुती बिंगले, सतीश सौदागर, विशाल अंभोरे, विशाल यादव, विजय लांडे, अक्षय वर्पे, आदेश मोरे, आनंद बुधेकर, अक्षय नागरे, सुहास पंडित, प्रफुल्ल रावत आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com