Thursday, April 25, 2024
Homeराजकीयओबीसी आरक्षण रद्दला फडणवीसच जबाबदार

ओबीसी आरक्षण रद्दला फडणवीसच जबाबदार

जळगाव । प्रतिनिधी

ओबीसी समाजासोबत असल्याचा एकीकडे आव आणायचा आणि दुसरीकडे पाय खेचायचे ,ओबीसी नेत्यांना बदनाम करायचे असा प्रकार देवेंद्र फडणवीस करतात. त्यांची भूमिका ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ ची आहे.असा निशाणा साधत ओबीसी आरक्षण रद्दला फडणवीसच जबाबदार असल्याची तोफ माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना डागली.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणावरुन राजकारण सध्या चांगलेच तापले आहे.सत्ताधारी – विरोधक एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करु लागले आहेत.दरम्यान,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे. खडसे म्हणाले की,देवेंद्र फडणवीस म्हणतात की,केंद्र सरकारचा काय संबंध आहे.राज्य सरकारने करायला पाहिजे होतं.जर राज्य सरकारचे काम होते तर तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते तेव्हा काय केलं असा टोलाही खडसे यांनी फडणवीसांना लगावला.

भाजपकडून ओबीसींची दिशाभूल

2011 मध्ये जनगणना झाली.लोकसंख्येचा डाटा केंद्राकडे उपलब्ध झाला आहे.दिल्लीत भाजप सरकार आहे.त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते.आता तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे.हा भाजपचा खोटरडेपणा नाही का? असा सवाल उपस्थित करत भाजप ओबीसींची दिशाभूल करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

फडणवीस सत्तेसाठी हपापले

ओबीसी आरक्षणासाठी स्व.गोपीनाथ मुंडे,छगन भुजबळ यांनी आग्रह धरला.अलीकडच्या काळात खा.प्रितम मुंडे,खा.रक्षा खडसे यांनीही जनगणनेच्या आधारावर आरक्षण मिळायला पाहिजे अशी लोकसभेत मागणी केली आहे.मला सरकारमध्ये येवू द्या,असे फडणवीस विधान करतात. म्हणजे काय तर ,तुम्ही सत्तेसाठी हपापले आहे, अशा शब्दात खडसे यांनी फडणवीसांचा समाचार घेतला.

..तर ही वेळ आली नसती

2011 मध्ये झालेल्या जनगणनेचा पतंप्रधान नरेंद्र मोदी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डाटा मिळाला असता किंवा सुप्रिम कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही झाली असती तर ओबीसी आरक्षण रद्दची वेळ आली नसती.याला सर्वस्वी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री खडसे यांनी केला.

मागासवर्गीय आयोगाची स्थापना

ओबीसी आरक्षाणासंदर्भात राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने नुकतीच मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु केली असल्याची माहिती माजी मंत्री खडसे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या