Friday, April 26, 2024
Homeराजकीयमाजी आ. शरद पाटील यांचा मुंबईत झाला काँग्रेस प्रवेश

माजी आ. शरद पाटील यांचा मुंबईत झाला काँग्रेस प्रवेश

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी आ. प्रा. शरद पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे खान्देशात काँग्रेसचे बळ वाढेल, असा विश्वास आ. पटोले यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदीवासी विकास मंत्री के. सी, पाडवी, कार्याध्यक्ष नसिम खान, ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप,धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, धुळे शहराध्यक्ष युवराज करनकाळ प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी खा. बापू चौरे, माजी आ. डी.एस. अहिरे, अतुल लोंढे, देवानंद पवार, प्रकाश सोनावणे आदी उपस्थित होते. तसेच नाशिक काँग्रेस अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, धुळे तालुका कॉग्रेस अध्यक्ष भगवान पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील,पं.स.गटनेते पंढरीनाथ पाटील, कृऊबा प्रशासक रितेश पाटील, धुळे तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, विशाल सैंदाणे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे,एन.डी.पाटील, अरुण पाटील,संतोष राजपुत,विशाल पाटील, बापू खैरनार,रावसाहेब पाटील,कृष्णा पाटील, संभाजी गवळी, भाऊसाहेब पाटील,नंदू धनगर,झुलाल पाटील,दिनेश माळी, सागर पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

धुळे ग्रामीणचे माजी आ.शरद पाटील यांनीही माजी मंत्री रोहिदास पाटील, आ.कुणाल पाटील यांच्याशी विचार विनिमय करुन पुन्हा काँग्रेस पक्षात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला.

प्रा. पाटील यांचे पक्षात स्वागत करतांना प्रदेश कार्याध्यक्ष तथा आ.कुणाल पाटील म्हणाले की, धुळे जिल्हा आणि खान्देश हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. सन 2004 मध्ये उत्तर महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचे 27 आमदार निवडून आले होते आणि त्यांच्या बळावर आपण महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार स्थापन करु शकलो होतो.

माजी आ.प्रा.शरद पाटील आणि त्यांच्यासह असख्य कार्यकर्ते व नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्हयातील काँग्रेस काँग्रेसची ताकद निश्चितच वाढणार आहे. म्हणून आज खरच आनंदाचा दिवस आहे. येणार्‍या काळात काँग्रेस स्वबळावर निवडणूका लढवून जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता स्थापन केल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अपात्र ठरलेल्या धुळे जिल्हा परिषदेच्या 15 जागांपैकी 12 जागा काँग्रेस पक्षाच्या निवडूण आणू आणि जिल्हा परिषदेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करु असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या