Sharad Pawar Resigns : हे कुठेतरी खटकते, त्यांनी...; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

Sharad Pawar Resigns : हे कुठेतरी खटकते, त्यांनी...; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केला असून हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली. तर छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे यांच्या सारख्या बड्या नेत्यांना यावेळी अश्रू अनावर झाले आहेत. यानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे...

अनुभवी नेता जर बाहेर पडला तर नुकसान होईल म्हणून पक्षात त्याचं राहणं गरजेचं आहे. त्या समितीने शरद पवारांना पुन्हा पक्षात राहण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे. तसेच काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. पण सध्या राज्यात चाललेलं राजकारण बघता शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करणे हे कुठेतरी खटकते. केंद्र पातळीवर सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात मोठी फळी तयार करत असताना शरद पवारांचा असा निर्णय न पटणारा आहे. असं अशोक चव्हाण म्हणाले.

Sharad Pawar Resigns : हे कुठेतरी खटकते, त्यांनी...; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!; अजित पवारांनी शरद पवारांसमोर दटावले

दरम्यान, 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर, कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे, माणसाला अधिक मोह असू नये, आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही... आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे," असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com