अध्यक्ष निवडणूक आता पुढील अधिवेशनात

अध्यक्ष निवडणूक आता पुढील अधिवेशनात

मुंबई | Mumbai

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून (Election of Assembly Speaker) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि राज्यपाल (Governor) यांच्यात पुन्हा एकदा वाढ सुरु झाला आहे...

आज हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. अशातच या निवडणुकीसंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या हिवाळी अधिवेशनात (Winter session) होणार नाही. याबाबत काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.

आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम होते. मात्र, मविआ सरकारने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांकडून अद्याप कुठलाही निर्णय आला नाही.

राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही करण्यात आली होती. मात्र कोणत्याही अडचणीत सापडू नये यासाठी आज निवडणूक न घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार नसल्याने आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार? अशी चर्चा होत आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एक विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते किंवा राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवड होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन...

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चर्चा करण्यात आली. यावेळी कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. शरद पवारांनी विधानसभा अध्यक्ष निवडणूक न घेण्याचा सल्ला दिला. या निर्णयावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com