गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

दोन टप्प्यात निवडणूक, 'या' तारखेला निकाल

गांधीनगर | Gandhinagar

गुजरातमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत महत्वाची घोषणा केली आहे...

केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिला टप्पा 1 डिसेंबरला होणार आहे तर दुसरा टप्पा 5 डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. 

पहिला टप्पा निवडणूक कार्यक्रम

नोटिफिकेशन – ५ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १४ नोव्हेंबर

अर्जांची छाननी – १५ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर

मतदान – १ डिसेंबर

दुसरा टप्पा निवडणूक कार्यक्रम

नोटिफिकेशन – १० नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर

अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर

मतदान – ५ डिसेंबर

दोन्ही टप्प्यांची मतमोजणी आणि निकाल – ८ डिसेंबर

गुजरात निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) दोन टप्प्यात होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. त्याचप्रमाणे आता दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com