राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; राजीव सातव यांच्या जागी कोण?

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls election) जाहीर केली आहे. तामिळनाडूमधील (Tamilnadu) २, तर पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) प्रत्येकी एका जागेवर ही पोटनिवडणूक होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान होईत तसेच त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल.

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचं १६ मे रोजी अकाली निधन झालेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील एक जागा रिक्त झाली होती. नियमानुसार सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक अपेक्षित असते. त्यानुसार आज पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या जागेवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राजीव सातव (Rajiv Satav) हे गुजरातचे काँग्रेस (Gujrat Congress) प्रभारी होते. त्यामुळे सातव यांच्या निधनाने दोन पदे रिकामी झाली आहेत.

त्यातच आता पोटनिवडणुकीची घोषणा झाल्याने राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी दिग्गज नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसमधील एका गटाकडून होत आहे. तर त्याच दरम्यान माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक (Former Union Minister Mukul Wasnik) आणि माजी खासदार अविनाश पांडे (Former MP Avinash Pandey) यांच्या नावांचीही जोरदार चर्चा रंगत आहे.

मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांना पुन्हा एकदा संधी मिळतेय की राजीव सातव यांच्या जागी पुन्हा एकदा ओबीसी (OBC) चेहरा शोधला जातो, हे पाहावं लागेल. कारण, सातव यांच्या घरात त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना नुकतंच काँग्रेस कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं आहे. त्यांच्याबाबतीत नेमका काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. तसंच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या देखील राज्यसभेच्या जागेचा प्रश्न आहे. ते नेमके कुठून राज्यसभेत जाणार? की त्यांना महाराष्ट्रातून संधी दिली जातेय हे पाहावं लागेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *