<p><strong>मुंबई - Mumbai</strong></p><p>राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री एकनाथराव खडसे यांची नुकतीच ईडीने चौकशी केल्यानंतर ईडीने हायकोर्टात आपलं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानुसार खडसे यांना अटकेपासून दिलासा देण्यास विरोध असल्याचे म्हटले असून या याचिकेवर खडसे यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला.</p>.<p>ईडीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या २५ रोजी सुनावणी होणार आहे. एकनाथराव खडसे यांनी दाखल केलेल्या याचिके म्हटले आहे की, ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या चौकशीचा व्हिडीओ करण्याची मागणी केली आहे. तसेच तपासात सहकार्य करत असल्याने कोणतीही कठोर कारवाई करू नये अशी मागणी केली आहे.</p>