Friday, April 26, 2024
Homeराजकीयरोहिणीताई, मंदाताई, जगवाणींसह 72 जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रोहिणीताई, मंदाताई, जगवाणींसह 72 जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडत शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांच्या पत्नी तथा महानंदा दूध डेअरीच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन अ‍ॅड. रोहिणी खडसे,

- Advertisement -

माजी आमदार तथा सिंधी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरुमुख जगवाणी यांच्यासह जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक तसेच राज्यातील इतरत्र भागातील जवळपास 72 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, जळगावचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदाताई खडसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे, माजी आ. गुरुमुख जगवाणी, तळोदा येथील माजी आ. डॉ. नरेंद्र पाडवी, बोदवड येथील कृउबाचे माजी सभापती निवृत्ती पाटील, चाळीसगावचे माजी सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, मुक्ताई सूतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, भाजप सरचिटणीस संदीप देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे यांचे मंचावर प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले.

औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे, जळगावचे दिलीप कोल्हे, जळगाव दूध संघाचे जगदीश बढे, सुभाष टोके, अतुल झांबरे, हेमराज चौधरी, जि. प. चे सभापती राजेंद्र चौधरी, माजी जि. प. चे सदस्य कैलास चौधरी, राम बोडके, श्रीगोंदाचे नवनाथ केदारे, भुसावळचे माजी शहराध्यक्ष वसंत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, शिरपूरचे मनोज उत्तम महाजन, युवा मोर्चाचे सुमित बर्‍हाटे, सोशल मीडियाचे पृथ्वीराज पाटील, बसवलचे प्रमोद पाटील, गणेश किनगे, भुसावळचे अनिकेत पाटील, मातृभूमी मंडळाचे किशोर पाटील, भुसावळचे माजी सभापती सुनील महाजन, गोलू पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब देशमुख, मुक्ताईनगरचे माजी सभापती विलास धायडे, बोदवड बाजार समितीचे अनिल वर्‍हाडे, माजी जि. प. चे सदस्य दुर्गादास पाटील, माजी जि. प. चे माजी उपाध्यक्ष संजीव पाटील, धुळे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, मुक्ताईनगरचे दशरथ कांडेलकर, जळगावचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, जळगावचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील, अमळनेर भाजपचे सुभाष चौधरी, माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन, धुळे भाजपचे गणेश मुकुंदे, पुणे येथील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ, कल्याण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळी, बोदवड पं. स. चे माजी सभापती गणेश पाटील, मुक्ताई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर.पी. बर्‍हाटे, चाळीसगावचे सतीश दराडे, जळगावचे चंदन कोल्हे, बुलढाणा जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप नाफडे, मुंबई युवा मोर्चाचे प्रशांत भिसे, गणेश पारडे, नंदुरबार भाजपचे वैद्यकीय आघाडी अध्यक्ष तुषार सनन्से, नंदुरबारच्या शामराव आघाडे, शहादा तालुक्यातील डोंगरगावचे सरपंच विजय पाटील, नंदुरबारच्या शिक्षक आघाडी अध्यक्ष के.एम. पटेल, बोदवड बाजार समितीचे उपसभापती अनिल पाटील, संचालक रामदास पाटील, योगेश पाटील, भीमराव पाटील, बोदवड तालुक्यातील लोणसिमचे सरपंच अंकित पाटील, अमळनेरचे बाजार समितीचे उपसभापती श्रावण ब्रम्हे, माजी संचालक कामराज पाटील, अमळनेर पं.स.चे माजी सभापती दीपक पाटील, अकोट, जि. अकोलाचे रामप्रभू तराळे पाटील, अकोल्याचे कृष्ण अंधारे, मनोज तायडे, रवी पाटील यांनी खडसे यांच्यासह पक्षांतर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या