जळगाव - Jalgaon :

सत्ताधारी पक्षात असलो तरी मी विधानसभेचाही सदस्य नाही. त्यामुळे सूडाच्या राजकारणाचा प्रश्नच येत नाही. सुडाच्या राजकारणाचा मीच सर्वात मोठा बळी आहे,

असा खुलासा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना केला.

तसेच निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यामागे तो मोठा नेता कोण याचे स्पष्टीकरण गिरीश महाजनांनीच द्यावे असेही ते यावेळी म्हणाले.

माझ्यावर एक नव्हे १० ते ११ गुन्हे दाखल करण्यात आले. त्याबाबत मी भाजप म्हणजेच सत्ताधारी पक्षात होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना याबाबत बोललो तर फडणवीसांनी गुन्हा दाखल करण्यास त्यांनीच सांगितल्याची कबूली दिली होती.

तसेच ते म्हणाला गुन्हा दाखल होवू द्या आपण मागे घेवू असेही बोलले होते. असा धक्कादायक खुलासाही यावेळी एकनाथराव खडसे यांनी केला.