Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयपक्षांतर सोहळ्याचा जल्लोष

पक्षांतर सोहळ्याचा जल्लोष

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील मुरब्बी राजकीय नेता तथा माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

त्याचे पडसाद जळगाव शहरातील जिल्हा परिषदेसमोर फटाके फोडून नाथाभाऊ समर्थकांनी एकच जल्लोष केला.

कोरोना संसर्गाच्या साथीमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना इच्छा असूनही या पक्षात्तरांचा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जाता आले नसले तरी काहींनी हा पक्षांत्तराचा सोहळा घरुनच टिव्हीवरुन पाहिला.

तर काही भाजपच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी चोरी-छुपके या पक्षांत्तर सोहळ्याचा घरात बसून धन्यता मानल्याची चर्चा रंगू लागली आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी गेल्या 40 वर्षापासून भाजपामध्ये काम करुन ग्रामीण भागासह शहरात भाजपाचा बालेकिल्ला बनविला.

मात्र,वरिष्ठस्तरावरुन राजकीय खेळीने एकनाथराव खडसे यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. परंतु, खडसे यांनी स्वस्थ न बसता अखेर भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. शुक्रवारी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन भाजपाला जोरदार धक्का दिला.

टिव्ही, मोबाईलवरुन पाहिला सोहळा

कोरोनाच्या सावटामुळे अनेक जणांना मुंबईमध्ये जाता आले नाही. मात्र, नाथाभाऊंच्या पक्षांत्तर सोहळा पाहण्यासाठी काहींनी टिव्ही, मोबाईल आदी साधनांचा वापर करुन हा सोहळा पाहिला. तर काहींनी घरातच बसून सोहळ्याचा आनंद लुटला.

शहरात फटाक्यांची आतिषबाजी

नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सोहळा मुंबईमध्ये झाला असला तरी जळगावात समर्थकांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर फटाके फोडून जल्लोष केला. तसेच राष्ट्रवादी कार्यालयासमोर आतिषबाजी करण्यात आली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुपचूप पाहिला सोहळा

नाथाभाऊंसोबत कोण-कोण प्रवेश करणार याविषयी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह नेत्यांमध्ये उत्सुकता आणि मनातील घालमेल सुरु होती. शुक्रवारी दुपारी 2 वाजेचा प्रवेश सोहळा होणार असल्याने अनेकांनी टिव्ही समोर बसून त्या क्षणाची वाट पाहिली.

जसा-जसा प्रवेश सोहळा लांबणीवर पडत होता.तशी-तशी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. जोपर्यंत नाथाभाऊ यांच्यासह समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत नाही. तोपर्यंत अनेकांच्या नजरा टिव्हीसमोरुन हटत नव्हत्या.

अखेर 4 वाजता खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नाथाभाऊ समर्थकांनी जल्लोष केला. भाजपच्या काहींनी चोरी-चोरी,छुपके घरातच बसून हा सोहळा पाहिल्याची चर्चा सुरु होती.

सोशल मीडियावर फक्त नाथाभाऊंचीच चर्चा

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दिवसभर सर्वत्र सोशल मीडियावर फक्त नाथाभाऊंच्याच प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.

नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दिवसभर सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून, खल काढण्यात आला. अनकेजण खडसेेंच्या या निर्णयाचे स्वागत करतांना दिसून आले. तर अनेकांनी खडसे राष्ट्रवादीत गेल्यामुळे भाजपावर संघटनात्मकदृष्टया काहीही फरक पडणार नाही असे मत व्यक्त केले.

एकूणच बर्‍या वाईट पध्दतीने का होईना मात्र दिवसभर सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी एकनाथराव खडसेच असल्याचे बघावयास मिळाले. खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबत मात्र भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी मात्र मौन बाळगलेले दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या