‘मी पुन्हा येणार’... आता भाजपला कधीच शक्य नाही

एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असून कोण काम करते व कोण सर्वसामान्यांना न्याय देते हे सर्वसामान्य जनता जाणून आहे.

विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमधे येण्यास उत्सूक आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांना अनेक भूलथापा देउन लवकरच आपले सरकार पुन्हा येणार आहेत. असे सांगत थोपवले जात आहे.

परंतु औषधालाही कार्यकर्ता उरणार नाही, भवितव्याचा विचार करावा ते कुठे असतील, आणि मी पुन्हा येणार असे कितीही सांगीतले तरी ते कधीच शक्य होणार नाही.

हे सरकार निर्वीवादपणे पूर्ण पाचवर्षे चालणार, असे माजी मुख्यमंत्र्यांच्या नामोल्लेख न करता खणखणीत तोफ डागली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा संपर्क संवाद अभियान यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर 9 तारखेस येणार आहेत.

यासंदर्भात पदाधिकारी कार्यकत्यर्ांची आढावा आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले कि, जिल्हयात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांत सर्वच पक्ष विजयी होण्याचा दावा करत असले तरी मुक्ताइनगर तालुक्यात विरोधी पक्ष भाजपाकडे केवळ 7 ग्रा.पं. आहेत.

तर उवर्ंरीत जिल्ह्यात देखिल बोटावर मोजण्या इतपत ग्रा.पं.त सदस्य निवडून आले आहेत. विरोधी पक्षाच्या ताफयात केवळ बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते पदाधिकारी राहीले आहेत. असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलतांना दिला.

30 वर्षे विरोधात, पण आज सोबत

विधानसभा अध्यक्ष असतांना तसेच गेले 30 वर्षांपासून नाथाभाउंनी विरोधकांचे राजकारण केले आहे. पण आज जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांच्या सोबत व्यासपिठावर बसून सेाबत काम करीत आहे.

त्यामुळे अ‍ॅड. पाटील यांना वेगळेच बळ आले असून राजकारणात काय होईल याचा नेम नाही. परंतु अनुभवी खडसेंमुळे पक्षाला पुन्हा नवीन ताकद मिळाली असून आगामी काळात जिल्ह्यात सर्वच आमदार राष्ट्रवादीचे असतील.

यासाठी तीन वर्षे कालावधी आहे, कार्यकत्यर्ांंनी पक्ष संघटन बळकटी करणासाठी कार्य करावे. तसेच जोपर्यत पक्षाध्यक्ष शरद पवार आहेत. तोपर्यत महाविकास आघाडीचे सरकार निर्विवादपणे सत्तेत रहाणार असल्यावे माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी मार्मीकपणे सांगीतले.

यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी, माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील, अ. गफफार मलिक, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, मंगला पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, सोपान पाटील, माजी आमदार मनीष जैन, अरूण पाटील, पाचोर्‍याचे संजय वाघ, नितीन तावडे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, विकास पवार, योगेश देसले आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com