Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट...; एकनाथ शिंदेंचे नवे ट्विट चर्चेत

आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट…; एकनाथ शिंदेंचे नवे ट्विट चर्चेत

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मोठे सत्तांतर पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटाने (Shinde Group) महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. या दरम्यान शिवसेनेला (Shivsena) एकामागे एक धक्के मिळत आहेत. तसेच दिवसेंदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) ताकदही वाढताना दिसून येत आहे….

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Ekanth Shinde) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केवळ माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख त्यांनी केला नसल्याने जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एक ट्विट केले आहे. हे ट्विटही चांगलेच चर्चेत आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल… शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच ट्विटमध्ये त्यांनी निवडणूक निकालाचे पोस्टर टाकले असून यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी आहे. या आकेवारीत उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गट असा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या