
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील सत्तासंघार्षाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लाऊन असताना, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्यानुसार आता शिंदे गटाच्या शिवसेनेला खऱ्या अर्थाने अधिकृत केल्याचा शिक्का मारला आहे...
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या गटालाच शिवसेना हे नाव मान्य केले आहे, त्याबरोबरच पक्षाचे अधिकृत असणारे धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदेंच्या शिंदेंच्या शिवसेनेला दिले आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले की, हा लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू.
आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. तसेच त्यांनी योग्य निर्णय घेतला आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही बंड केले होते त्यानंतर कायदेशीर लढाई लढली. आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळी कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर हा निर्णय आला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.