मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर, 'या' तारखेला कामाख्या देवीचं घेणार दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर, 'या' तारखेला कामाख्या देवीचं घेणार दर्शन

मुंबई | Mumbai

राज्यातील सत्तातंराचे केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुन्हा एकदा भेट देणार आहेत.

राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते २१ नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आणि तब्बल ४० शिवसेना आमदारांना घेऊन सत्तेबाहेर पडले. त्यांच्यासह मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांनी देखील सत्तेतून काढता पाय घेतला होता. हे सर्व आमदार गुवाहाटीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते.

शिंदे गटाच्या या सर्व ५० आमदारांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरच ते पुन्हा राज्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com