Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात 'शिंदे सरकार'! एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

राज्यात ‘शिंदे सरकार’! एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई | Mumbai

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (Chief Minister) असतील, अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर आज सायंकाळी ७.३० वाजता राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला….

- Advertisement -

सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरण करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तसेच भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचा जयजयकार केला.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह जे पी नद्दा यांनी केला. त्यांच्या या आग्रहाखातीर देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनात उपस्थित झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या