Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआम्हाला कायदा शिकवू नका; १२ आमदारांच्या कारवाईवर एकनाथ शिंदे म्हणाले...

आम्हाला कायदा शिकवू नका; १२ आमदारांच्या कारवाईवर एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावे, अशी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात कायदेशीर लढाई सुरु झाल्याचे दिसून येते…

- Advertisement -

आज सकाळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या प्रकारे निलंबन करण्याचा अधिकारच नाही. आमच्याकडे बहुमत असताना अशी कारवाई होऊ शकत नाही.

बैठकीला हजेरी लावली नाही म्हणून अपात्र ठरवणे हे तर देशातील पहिलेच उदाहरण ठरेल. जो अधिकारच नाही तो बजावता येणार नाही. देशात कायदा, राज्यघटना आहे त्याप्रमाणेच चालावे लागेल. वाटेल तसे वागता येणार नाही, असे ते म्हणाले.

सरकार कोसळणार?; अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ते पुढे म्हणाले की, आमची एक बैठक होणार असून त्यानंतरच पुढील रणनीती ठरवण्यात येईल. आम्ही बहुमताची संख्या पार केलेली आहे. अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहेत. तांत्रिक आणि कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सत्तास्थापनेसंदर्भात आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. बैठकीनंतरच सत्तास्थापनेचा निर्णय घेतला जाईल.

एकीकडे राजकीय भूकंप दुसरीकडे मंत्रालय हाऊसफुल्ल; ‘हे’ आहे कारण

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी बंड केलेल्यांना पुन्हा यावेच लागेल, असा इशारा दिल्या आहे. यावर ते म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र लोकशाहीत संख्या महत्वाची असते.

शिंदे गटात इतके आमदार कसे?; काँग्रेस-राष्ट्रवादीची शंका

कायद्याप्रमाणे आहे तेच करावे लागते. आमची बाजू भक्कम आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) ही महाशक्ती आमच्यामागे आहे. त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठीशी आहेत, असे ते म्हणाले.

तसेच खरी शिवसेना (Shivsena) कोणती? उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) की तुमच्यासोबत असलेल्या आमदारांची असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, असा कोणताही दावा आम्ही केला नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. बैठकीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या