
मुंबई | Mumbai
आज मुंबईमध्ये मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विकासकामांचा पाढा मोदींसमोर वाचला. तसेच त्यांनी दावोसमध्ये घडलेला एक प्रसंग सांगत मोदींची स्तुती केली...
एकनाथ शिंदे म्हणाले की, जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणीही मोदींचीच हवा होती, अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारले असे मुख्यमत्री शिंदे म्हणाले. दावोसमध्येही मोदींचे भक्त असल्याचे मला जाणवले असेही ते म्हणाले.
येत्या काळात मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमधील आर्थिक परिषदेसाठी गेले होते. त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी सांगितला. मुख्यमंत्री म्हणाले की, दावोसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक देशांचे पंतप्रधान भेटले, अधिकारी भेटले. त्या ठिकाणीही मोदींचे भक्त होते. त्यांनी मला विचारले की तुम्ही मोदींसोबत आहात का? त्यावेळी मी म्हणाले की मी त्यांचाच माणूस आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.