पदाचा वापर सर्वसामान्यांसाठी व्हावा

पदाचा वापर सर्वसामान्यांसाठी व्हावा

नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांची अपेक्षा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होवून भगवा फडकला. त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. पदाचा वापर सर्वसामान्यांसाठी, शहराच्या विकासासाठी व्हावा. अशी अपेक्षा राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी व्यक्त केली.

नगरविकास मंत्री शिंदे हे शनिवारी जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले होते. सायंकाळी त्यांनी जळगाव महापालिकेत येवून आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ना. शिंदे यांचे सायंकाळी 7.30 वाजता महापालिकेत आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

त्यानंतर 17 व्या मजल्यावरील महापौरांच्या दालनात महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात आढावा बैठक घेतली.

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, भाजपचे बंडखोर नगरसेवक उपस्थित होते. मनपा प्रशासनाचे टोचले कान

नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी आढावा बैठकीत मनपासह न.पा. प्रशासनाचे चांगलेच कान टोचले आहे. शहराच्या विकासासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा, लोकसभागातून कामे करा, आस्थापना खर्चावर नियंत्रण आणा, विकास कामे दर्जेदार करा, ती वेळेत पुर्ण करा. अशा शब्दात ना. शिंदे यांनी आढावा बैठकीत प्रशासनाचे कान टोचले.

रस्त्यांसाठी तात्काळ 42 कोटी मंजूर करणार

जळगाव शहरातील रस्ते सुस्थितीत आणावे लागतील त्यासाठी 42 कोटींच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येणार असल्याचे ना. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेत गटबाजी नाही

जळगाव महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत ना. एकनाथराव शिंदे यांना विचारले असता, त्यांनी शिवसेनेत कुठलीही गटबाजी नसल्याचा खुलासा केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com