एकनाथ शिंदे यांची अधिक काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या होत्या - वळसे पाटील

एकनाथ शिंदे यांची अधिक काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या होत्या - वळसे पाटील

पुणे |प्रतिनिधी| Pune

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या. एकनाथ शिंदे यांना आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमिवर त्यांची अधिक काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागाला आणि ठाणे पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे ती चर्चा अनावश्यक स्वरूपाची असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

वळसे पाटील म्हणाले,, श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या पत्रानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिंदे गटाकडून करण्यात येणारे आरोप खोटे आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या असेही वळसे पाटलांनी यांनी यावेळी सांगितले आहे.विशेष म्हणजे त्यांनी याबाबत कुठलीही मागणी केली नव्हती त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी पत्र दिले होते आणि ते पत्र राज्याचे पोलिस विभागाचे प्रमुख यांना पाठविण्यात आले होते,असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. विशेषतः अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीने व कल्पक नेतृत्वाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यशाच्या शिखरावर वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी असून यामधून राज्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील.अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com