Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या“बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण...”; एकनाथ शिंदेंचं ट्विट

“बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण…”; एकनाथ शिंदेंचं ट्विट

मुंबई । Mumbai

शिवसेनेचे खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवले;
डॅमेज कंट्रोलसाठी दोन नेते सुरतकडे रवाना

याच दरम्यान एकनाथ शिंदेनी ट्विटर वरून शिवसेनेचं नाव हटवलं आहे. तसेच त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.”

- Advertisment -

ताज्या बातम्या