Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (eknath shinde) हे महाराष्ट्राचे (maharashtra) नवे मुख्यमंत्री (new Chief Minister) असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप (bjp) आणि शिंदे गटाच्या (shinde group) युतीचे सरकार स्थापन होईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत केली…

- Advertisement -

आज फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनावर (Raj Bhavan) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली.

यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपाने १०५ जागा आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. जवळपास १६१ युती आणि अपक्ष मिळून १७० बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचे सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपाला बाहेर ठेवले. हा खरेतर जनमताचा अपमान होता. जनतेचा कौल भाजपा-शिवसेनेला होता. परंतु त्याचा अपमान करून महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे फडणवीस म्हणाले.

तसेच फडणवीस पुढे म्हणाले की,” लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील. मी स्वत: बाहेर असेन. पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझी देखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या