
मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दसरा मेळाव्यावरून गेल्या काही दिवसांत मोठा वाद सुरू आहे. तसेच एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि मंत्र्यांनी हिंदू गर्वगर्जना यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागात सभांचे आयोजन केले आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी एक ट्विट करत शिंदे गटाला डिवचलं आहे.
अंबादास दानवे यांनी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा एका कार्यकर्त्यासोबत डोक्यावर जाळीची टोपी घातलेला फोटो ट्विट करत टोला लगावलाय. (Shivsena) काल झालेल्या मेळाव्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जुम्मे की नमाज को जाना है, म्हणत सत्कार कार्यक्रम रद्द करायला लावला होता. यावर देखील दानवे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून टीका केली.
भुमरेंचा फोटो ट्विट करत दानवेंनी म्हटले आहे की, 'सत्तारांची नमाज आणि भुमरेंची टोपी! व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से काहो हम हिंदू है! काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना! व्वा! ओक्के!! #मिंधेगट' अशाप्रकारे ट्विट करत अंबादास दानवे यांनी सोबतच भुमरेंचा मुस्लीम पेहरावातला फोटो देखील शेअर केला आहे.