CM Eknath Shinde : मुख्यमंत्रीपद कसं मिळालं? एकनाथ शिंदेंनी सांगितली Inside Story

CM Eknath Shinde
CM Eknath ShindeFile Photo

मुंबई | Mumbai

राज्यातील महासत्तांतराबाबत आजही राज्यातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले.

शिंदे गटापेक्षा भाजपकडे जास्त संख्याबळ असतानाही एकनाथ शिंदेंना भाजपने (BJP) मुख्यमंत्रीपद कसं दिलं, असाही प्रश्न जनतेच्या मनात आजही उपस्थित होत असतो. आता याच प्रश्नाचं उत्तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असं अनेकांना वाटत होतं. परंतु त्यावेळी लोकांच्या मनात जे होतं त्याच्या उलट घडलं. भाजपाचे आमदार शिंदे गटापेक्षा जास्त असतानाही मोदी-शहांनी मला मुख्यमंत्री केलं.

मला मुख्यमंत्री करण्यात देंवेंद्र फडणवीस यांचाही मोठा वाटा होता, खरंतर मी मुख्यमंत्री होण्यासाठी काहीही केलेलं नव्हतं. परंतु ऐनवेळी पीएम मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी लोकांच्या मनात होतं, त्याच्या उलट केलं, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं जो कौल दिला होता, तेच सरकार स्थापन व्हायला हवं, असा आमचा प्रयत्न होता. परंतु त्याला यश आलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याशी आमच्या विचारधारेचं गणित जुळत नव्हतं.

शिवसेना आणि भाजपाची अनेक वर्षांपासूनची युती असल्यामुळं लोकांनी आम्हाला मतदान केलं. बाळासाहेब ठाकरे आणि पीएम मोदी यांच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणुका लढवल्या. जनता मतपेटीतून बोलते, त्यामुळं त्यांच्या मनातलंच सरकार आम्ही बनवलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com