रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले,...

रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले,...

मुंबई | Mumbai

शिंदे गटाचे नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच आदित्य ठाकरेंपासून ते भास्कर जाधवांपर्यंत सर्वांवर रामदास कदमांनी पलटवार केला.दापोली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या,' असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.

तसेच 'उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही, शिवसेना कोकणी माणसाने मोठी केली आहे. मातोश्रीवर देखील अनेक खोके गेले आहेत ती अंदरकी बात आहे. आजची सभा बाळासाहेब ठाकरे जर बघत असतील आणि म्हणत असतील की, माझा मुलगा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामुळे बिघडलाय' अशी विखारी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

पुढे बोलताना रामदास कदम यांनी रविवारी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'आदित्य ठाकरे हे टुनटुन करत खोके खोके बोलत आहेत, आधी लग्न करून बघा, बायको आल्यावर मग संसार काय असतो ते कळेल. तेव्हा खोके काय ते कळेल, नुसती दाढी वाढवून काय उपयोग, असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com