Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदे मुंबईत दाखल; आजच शपथविधी होणार?

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; आजच शपथविधी होणार?

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह चाळीसहून अधिक आमदारांनी बंड केल्याने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय घडामोडींना अधिक वेग प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा गट काल गुवाहाटीहून गोव्यात पोहोचला. आज एकनाथ शिंदे मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. ते आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारने (Central Government) एकनाथ शिंदे यांना झेड सुरक्षा (Z Security) पुरवली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज चर्चा करून राजभवनावर जाणार असल्याचे समजते.

तसेच फडणवीस-शिंदे आजच सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आजच सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या