राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदे-फडणवीस घेणार अमित शाहांची भेट

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदे-फडणवीस घेणार अमित शाहांची भेट

मुंबई | Mumbai

मागील आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर आले होते. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे-फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे....

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदे-फडणवीस घेणार अमित शाहांची भेट
संतापजनक! महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहावर अत्याचार

शिंदे-फडणवीस आणि अमित शाह यांच्या बैठकीचे कारण अजून समोर आलेले नाही. मात्र राज्य सरकारचा रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदे-फडणवीस घेणार अमित शाहांची भेट
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

शिवसेना हे पक्षाच नाव आणि धनुष्यबाण याबाबत निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीवरदेखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील विकास कामांसंदर्भात चर्चा होण्याचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com