आज खडसेंसोबत कोण राष्ट्रवादीत येणार

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

एकनाथ खडसे सोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. दुपारी २ वाजता हा समारंभ होणार आहे. नाथाभाऊंसोबत अनेक कार्यकर्ते आणि नेते आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. आज काही नेत्यांचा प्रवेश होणार आहे. धुळे शहादा अकलाकुवा अकोला येथील माजी आमदार यांचा प्रवेश हा स्थानिक पातळीवर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. मुक्ताईनगर पालिका आणि बोदवड नगर पालिकेतही आज अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे जळगाव जिल्हाचे माजी अध्यक्ष आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *