विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसे म्हणाले, “भाजपने अडगळीत टाकलं आणि पवारांनी...”

विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसे म्हणाले, “भाजपने अडगळीत टाकलं आणि पवारांनी...”

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसकडून एकनाथ खडसे (Eknath khadse) आणि रामराजे निंबाळकर यांना (Ramraje Naik Nimbalkar) विधान परिषदेची (Maharashtra Legislative Council)उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे एकनाथ खडसे यांनी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे यांनी आभार मानले आहे. यासंदर्भात ते माध्यमांना बोलत होते. ते म्हणाले की, भाजपने मला फक्त गाजर दाखवलं. सत्ता माझ्या दृष्टीकोनातून मोठी नाही. पण ज्या प्रकारे मला आधार राष्ट्रवादीने दिला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्या पडत्या काळात माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्यांवर प्रामाणिक राहणं माझं कर्तव्य आहे.

तसेच, काही दिवसांपूर्वी लोक चर्चा करत होते की, 'एकनाथ खडसे संपले', 'ते आता विधिमंडळात परत पाय ठेवत नाहीत'. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. त्यासाठी मी या दोघांचाही ऋणी असल्याचे खडसे यांनी म्हटले.

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन एकनाथ खडसे यांनी भाजपला चांगलेच फटकारले. ते म्हणाले, पंकजा मुंडेंना उमेदवारी न देणं हा जरी पक्षांतर्गत निर्णय जरी असली तरी मुंडे-फुंडकर-खडसे यांनी भाजपाला बहुजन समाजाचा चेहरा म्हणून देण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देणे हे अत्यंत दुर्देवी आहे. खेदजनक आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com