जळगाव - Jalgaon

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचनालयानं (ED) नोटीस बजावली आहे.

काल मात्र, ED च्या नोटीस संदर्भात एकनाथ खडसे यांनी मौन स्वीकारलं होतं. पत्रकारांनी एकनाथ खडसेंना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला.

ते शिरपूर येथील दौऱ्यावर असताना अखेर पत्रकारांशी बोलले व ED ची नोटीस मिळाल्याचे त्यांनी सांगितले व 30 डिसेंबरला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याची माहिती दिली.

नोटीस मिळाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला फोन येत आहेत, एकंदरीत यातून मोठी सहानुभूती व्यक्ती केली जात असल्याचे ते म्हणाले.