नवाब मलिकांना विशेष न्यायालयाचा 'दणका'

मंत्री नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक

मुंबई । MUMBAI

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (Money laundering case) अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे....

या प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने (ED) आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये नवाब मलिक (Nawab Malik) यांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभाग (Money laundering case) असल्याचे म्हटले आहे.

त्यानंतर विशेष न्यायालयाने (Special court) मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंडसंदर्भातील (Goawala compound) आर्थिक गैरव्यवहारामध्ये (Money laundering case) सहभागी असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट होत असल्याचे निरिक्षण नोंदवले आहे.

तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची बहीण हसीना पारकर (Hasina Parkar) आणि सरदार खान (Sardar Khan) यांच्यासोबत नवाब मालिकांनी (nawab malik) अनेकदा भेट घेतल्याचा दावा ईडीने (ed) केला आहे.

याबाबत ईडीने नवाब मलिकांच्या विरोधात नोंदवलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी सरदार शहावली खानच्या (Sardar Shahavali Khan) साथीने गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंचा सर्व्हे केला. नवाब मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकर या दोघांसोबत अनेकदा बैठक केली. नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे एक गाळा अडवून ठेवला.

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान जेलमधून (Jail) पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा त्याच्यासोबतही बैठका झाल्या. गोवावाला कंपाऊंडचा अधिकाधिक भाग गिळंकृत करण्यासाठी नवाब मलिकांनी बेकायदेशीर भाडेकरू घुसवले. हसीना पारकरने सलीम पटेलच्या (salim patel) साथीने गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवला अशी कबुली हसीनाच्या मुलाने दिली आहे. त्यानंतर कालांतराने ही सर्व मालमत्ता नवाब मलिक यांना विक्री करण्यात आली.

दरम्यान ईडीने (ed) आपल्या दोषारोपपत्रात (Chargesheet) १७ जणांना साक्षीदार केले असून या दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने ((Special court)) नवाब मलिक आणि १९९३ बॉम्बस्फोटातील (1993 bomblast) दोषी सरदार शाहवली खान ((Sardar Shahavali Khan) या दोघांच्या विरोधात कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com