
मुंबई | Mumbai
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर (Thackeray Group MLA Ravindra Waikar) यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयानं (ED Filed Case) केस दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेकायदेशीरपणे हॉटेल बनवल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणअयात आला आहे.
रविंद्र वायकर यांच्यावर बेकायदेशीरपणे हॉटेल बांधल्याचा आरोप आहे. जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप असून हा ५०० कोटींचा कथित घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी वायकर यांना ईडीकडून चौकशीला बोलावले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ईडीने रविंद्र वायकरांशी संबंधित सर्व दस्ताऐवज आणि जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हे दस्ताऐवज त्यांनी प्राप्त झाले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
पत्नीवर आणि बिझनेस पार्टनरवरही गुन्हा दाखल
या प्रकरणात त्यांची पत्नी मनिषा वायकर, बिझनेस पार्टनर आसू नेहलानाई, राज लालचंदानी आणि प्रथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे शामिल है. रविंद्र वायकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हे राजकीय फायद्यासाठी करण्यात आलेले आरोप आहेत.
काय आहे प्रकरण?
आमदार रविंद्र वायकर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी मुंबई महापालिकेच्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल बनवण्याची परवानगी मिळवली होती. याद्वारे त्यांनी मुंबई महापालिकेच्या सहाय्यानं ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ईडीने या पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रे मागवली आहे. ईडीच्या इकनॉमिक ऑफेन्स विंगने या पूर्वी वायकर यांची चौकशी केली होती. आता ईडीने वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.