Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याहसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ED चा छापा

हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ED चा छापा

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय (ED) अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा धाड टाकली. हसन मुश्रीफांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kolhapur Kagal) येथील घरावर ईडीनं आज पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.

- Advertisement -

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब पाटील साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला होता.या प्रकरणात मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, ईडीने या आधी सुद्धा त्यांचावर कारवाई केली होती. आता आज पुन्हा कारवाई करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या