Thursday, April 25, 2024
Homeराजकीयराजकीय द्वेशातून नाथाभाऊंना ईडीची नोटीस

राजकीय द्वेशातून नाथाभाऊंना ईडीची नोटीस

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

पक्षात प्रवेश करतांनाच नाथाभाऊंनी ईडीच्या नोटीसबाबत सांगितले होते. राजकीय द्वेशातून त्यांना ईडीकडून त्यांना नोटीस बजाविण्यात आली.

- Advertisement -

नाथाभाऊ त्या नोटीसीला कायदेशीररित्या सक्षमपणे उत्तर देतील. तसेच प्रफुल्ल लोढा हा पक्षाचा सभासद देखील नसून त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राष्ट्रीवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्ह्याचे नेते एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलेले आहे. दररोज शेकडो तरुण पक्षात प्रवेश करीत असून भाजपाबद्दल राग व्यक्त करीत आहे.

महिनाभरापासून जिल्ह्यातील काही संस्थांच्या चौकशी सुरु झाल्या आहेत. यात भाजपाचे नेते व कार्यकर्ते अडकले आहेत. राजकीय द्वेशातून ईडीकडून नाथाभाऊंना नोटीस मिळाली आहे.

या नोटीसीला नाथाभाऊ सक्षमपणे उत्तर देवून सहीसलामत बाहेर येतील असेही अ‍ॅॅड. रविंद्र पाटील यांनी सांगितले.

लोढा पक्षाचा सभासदही देखील नाही

प्रफुल्ल लोढांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या नावाचा उल्लेख करुन नाथाभाऊंवर वैयक्तीकरित्या आरोप केले. त्याला आरोप करण्याचा काहीही संबंध नाही.

लोढा हा आमच्या पक्षाचा सभासद देखील नाही. त्याने पक्षाच्या सभासदाची पावती दाखवावी. अन्यथा त्याच्यावर पक्षाकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या