परिवहन मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस; संजय राऊत म्हणतात, शाब्बास...

परिवहन मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस; संजय राऊत म्हणतात, शाब्बास...

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब (State Transport Minister Anil Parab) यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटद्वारे ही माहिती देत सूचक विधान केले आहे. मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर राऊत यांनी 'शाब्बास' अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले आहे. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता' असं म्हणत राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच, अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र' असा टोलाही राऊत यांनी लगावला. (Ed Issued Notice To State Transport Minister Anil Parab)

दरम्यान, राणेंना अटक करण्यासाठी नेमकं कुणी सांगितलं होतं, याची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यामध्ये ते अटकेसंदर्भात बोलताना दिसून येत आहेत, यावरून भाजापाने परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलील असताना, आता ईडी कडून अनिल परब यांना नोटीस बजावली गेल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com