Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांच्या अडचणीत वाढ? ईडी तपासात 'ही' धक्कादायक माहिती उघड

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? ईडी तपासात ‘ही’ धक्कादायक माहिती उघड

मुंबई | Mumbai

पत्रा चाळ (Patra Chawl) प्रकरणी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) १ ऑगस्टला अटक केली होती. यानंतर त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून आर्थर रोड जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. आता ईडी (ED) तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे…

- Advertisement -

संजय राऊत हे मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते, अशी माहिती ईडी तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या (Shraddha Developers) संचालकांच्या मालकीच्या यो दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे कुटुंबीय करत होते. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत.

मविप्र निवडणूक : आमदार माणिकराव कोकाटेंची माघार

बुधवारी ईडीने (ED) मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकले. यात पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरचाही समावेश होता. पत्रा चाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. तसेच ईडीने अवनी इन्फ्रास्ट्रक्चरवरही छापा टाकला. ही कंपनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी सुरु केली होती, अशी माहिती ईडी तपासात समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या