
मुंबई | Mumbai
माजी मंत्री व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू उद्योजक सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) ताब्यात घेतलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र ईडीने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टची मालकी सध्या सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू आहेत.
साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ईडीने आज सदानंद कदमांना अटक केली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अब तेरा क्या होगा अनिल परब, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होत का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.