Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयकृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी दोंडाईचा काँग्रेसतर्फे रॅली

कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी दोंडाईचा काँग्रेसतर्फे रॅली

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

केंद्र शासनाने पारीत केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी दोंडाईचा येथे आज काँग्रेसतर्फे रॅली काढण्यात आली.

- Advertisement -

जिल्हा अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीचा शुभारंभ झाला.

रॅलीत शामकांत सनेर, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे यांनी ट्रक्टर चालवून जनतेचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पुढे राम मंदिर, स्टेशन रोड भाग, नंदुरबार चौफली वरुन कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात समारोप झाला. आज दोंडाईचा शहरात 5 मुख्य ठिकाणी बुथ लावून शेतकर्‍यांचा स्वाक्षरी घेण्यात आल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे, नानाभाऊ मराठे, माजी सभापती रामभाऊ माणिक, जब्बार बागवान, दिलीप पाटील, माजी नगरसेवक नंदू सोनवणे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक, जिल्हा उपाध्यक्ष पुष्पक पाटील,वसंत कोळी, अजिज बागवान, घनःश्याम राजपुत, अभय पाटील, प्रतिक देशमुख, अ‍ॅड.प्रमोद मराठे, आबीद शेख, पंकज चोळके, मनोज महाजन, सचिन परदेशी, मोहसिन शेख, हुसैन बोहरी, कल्लु पठाण, भैय्या सोनवणे, भैय्या शहा,मोना सजोद्दीन, मुन्ना खाटीक, सचिन सोनवणे, भारत जाधव, गणेश चकणे, विनोद नागरे, हर्षल पाटील, गोल्डी माणिक, निलेश ठाकूर, पंकज चोळके,बॉबी पाटील, राहुल सोनवणे, निखिल पाटील, रोहित सोनवणे, अमोल महाजन, आदित्य पदमोर, स्वप्नील गोसावी, भूषण पाटील,योगेश पाटील, योगेश कोळी, आनंद पाटील, महेंद्र महाजन, मनोहर महाजन, गिरीश पाटील, हरीश चौधरी, महेंद्र पाटील, मयूर पाटील, प्रणव पाटील उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या