Saturday, April 27, 2024
Homeराजकीयआ. जयकुमार रावल यांच्या वाढदिवशी 501 बॅग रक्त संकलन

आ. जयकुमार रावल यांच्या वाढदिवशी 501 बॅग रक्त संकलन

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

माजीमंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आ. जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईचा व शिंदखेडा शहरातील सामाजिक संघटनातर्फे मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करून दोंडाईचात 473 तर शिंदखेडात 28 असे एकूण 501 रक्त पिशव्या वातानुकूलित डब्यात सकंलीत करुन सायंकाळी आ. जयकुमार रावल यांची रक्ततुला करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी रावल उद्योग समुहाचे चेअरमन सरकारसाहेब रावल, आ. रावल यांचे सुपुत्र बाबाराजे जयअदीत्यसिंह रावल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शिंदखेडा शहराचे गटनेते अनिल वानखेडे, दोंडाईचा भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, राहुल रंधे, बांधकाम सभापती निखिल जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, रोटरी, जैन सोशल ग्रूप, अहिंसा परिवार आदी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, प्रो. चेअरमन राजेंद्र परदेसी, राजेश माखीजा, डॉ. मुकुंद सोहनी, डॉ. अनिल सोहनी, राजेश मुणोत, सौरभ अग्रवाल, सौरव मुणोत, अमन जयस्वाल, डॉ. दीपक श्रॉफ, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अनिल धनगर, डॉ. गणेश खैरनार, डॉ. हितेंद्र देशमुख, हुसेन भाई विरदेलवाला, के.टी.ठाकुर, केदारनाथ कवडीवाले, महेंद्र चोपडा, डॉ. राजेद्र गुजराथी, नामदेव थोरात, डॉ. पुरुषोत्तम भावसार, सुरेश जैन, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष दिनेश कर्नावट, चितंन कोचर, मयुर पारख, युवा जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष तुषार जैन, भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण महाजन, युवा मोर्चा अध्यक्ष राजु धनगर, बांधकाम सभापती निखिल जाधव, पाणीपुरवठा सभापती सौ. वैशाली महाजन, आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, नगरसेवक जितेंद्र गिरासे,भरतरी ठाकुर, अहिंसा परिवाराचे संचालक राजेश मुणोत, सौरव मुणोत, जायन्टसचे अध्यक्ष सुनिल शिंदे, आरसीसी दोंडाईचेकरचे इंदिरा रावल, अनिता मंडाले, रावल उद्योग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंदसिंह परमार, आदींनी प्रयत्न केले .

आ. रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईचा व शिंदखेडा शहरात रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात दोंडाईचात गरजूंना हुसेन विरदेलवाला यांच्यातर्फे अन्नदान, उपजिल्हारुग्णालयात फळवाटप, स्वच्छता मोहीम, शिंदखेडा शहरात शिंदखेडा शहर भाजपातर्फे ग्रामीण रुग्णालयात फळवाटप, कोरोना योध्दा व निवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच 47 वा वाढदिवस असल्याने शिंदखेडा शहरात 47 वृक्षांचे लागवड ही करण्यात आले.

शिरपूरचे आ. काशिराम पावरा, धुळे जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, शहादा तळोदाचे आ. राजेश पाडवी, मनपाचे उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक देवा सोनार, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, साक्रीचे सुरेश रामराव पाटील, नाशिक मनपाचे नगरसेवक गणेश बोलकर, जळगावचे नगरसेवक जयेश ठाकूर यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या