Friday, April 26, 2024
Homeराजकीययामुळे डॉक्टरांच्या अवमान नाहीच

यामुळे डॉक्टरांच्या अवमान नाहीच

मुंबई :

एका वाहिनीवर मुलाखती दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या डॉक्टर्ससंबंधात केलेल्या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटनांनी नाराजी, निषेध व्यक्त करत तक्रारी केल्या आहेत. काही संघटनानी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राऊत यांच्यावर कारवाई करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे आहे. या घडामोडींवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘मी काय बोललो आहे हे समजून न घेता काही राजकीय मंडळी काही मोहीम चालवणार असतील तर त्याला थारा देणार नाही. मी डॉक्टरांचा अवमान केला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी निघून गेली त्याचे कौतुक डॉक्टरांनी केले पाहिजे. डॉक्टरांची ताकद एवढी अफाट आणि अचाट असते. की त्यांनी कंपाऊंडर घडवले आहेत. हे कौतुक आहे, याचा सन्मान झाला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच मार्ड या संघटनांनी त्यांना माफीची मागणी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी राऊत म्हणाले की, काही विशिष्ट पक्षाचे लोक डॉक्टरांना हाताशी धरून मोहीम करत आहेत. WHO ही एक राजकीय संघटना तयार झाली आहे ट्रम्प आणि रशियानेही विरोध केला आहे. मी दिलगिरी व्यक्त करून, ट्र्म्प आणि पुतिन यांनी WHO बद्दल केलेले वक्तव्य पुसून जाणार आहेत का? मी WHO बद्दल बोललो होतो त्याचा आणि आपल्या डॉक्टरांचा काय संबंध आहे? असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील डॉक्टर संपावर गेलेते का ? पुतीन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला न विचारता लस बाजारात आणली म्हणून तेथील डॉक्टर आंदोलन करत आहेत का ?असा सवाल राऊत यांनी केला. संजय राऊत म्हणाले की, डॉक्टर मंडळी आमचीच आहे. डॉक्टरांच्या मदतीला मी स्वत: गेलो होतो. डॉक्टर अव्वाच्या सव्वा बील देत होते त्यांच्या विरोधात आंदोलने होत होती. तेव्हा मी डॉक्टरांच्या मदतीला धावलो आहे.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांना रुग्णसेवेत रस नसून औषधे विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे वक्तव्य आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, इथल्या नाही. त्यावेळी येथील संघटनांनी का आक्षेप घेतला नाही, असे राऊत म्हणाले. जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अवमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती, असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या डॉक्टर्ससंबंधात केलेल्या वक्तव्यानंतर मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या