Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत 'या' गोष्टी माहित आहेत का?

नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या सरकारला आज विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या (Assembly Speaker Election) निमित्ताने पहिल्या परीक्षेला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi) आमने-सामने होते…

- Advertisement -

यावेळी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार राजन साळवे यांना १०७ मते मिळाली. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

कोण आहेत नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा भाजप हा तिसरा पक्ष आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेकडून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जात. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती.

त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर केले. पण, शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी त्यांना पराभूत केले.

नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये गेले. आता भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत.

राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या