Thursday, April 25, 2024
Homeराजकीयप्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा अंशतः सुधारित कार्यक्रम

प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा अंशतः सुधारित कार्यक्रम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नोव्हेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या 3 नगरपरिषदा व 65 नगरपंचायतींमधील

- Advertisement -

सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा अंशतः सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात नगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत आणि पारनेर नगरपंचायतींचा समावेश आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होत आहे. मतमोजणी 3 डिसेंबरला होत आहे. त्यामुळे राज्यातील जालना व अन्य ठिकाणी या कामासाठी अपुरा वेळ मिळत असल्याने हरकती व सूचनांच्या सुनावणीसाठी मुदत वाढवून देण्याची आयोगास विनंती करण्यात आली होती. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.

प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी जिल्हाधिकार्‍यांनी देणे यासाठी पूर्वी 4 डिसेंबरपर्यंत मुदत होती ती आता 10 डिसेंबर करण्यात आली आहे. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासनाकडे अहवाल पाठविणे याबाबतची तारीख पूर्वी 10 डिसेंबर होती ती आता 15 डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे.

अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्याबाबतची तारीख पूर्वी 17 डिसेंबर होती ती आता 24 डिसेंबर करण्यात आली आहे. तसेच अंतिम अधिूचना पूर्वी 24 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार होते. नवीन परिपत्रकानुसार आता ही तारीख 30 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या